काव्यगंध

 असेल तिचा नकार तर,तो ही तू कर हसत स्वीकार
तिलाही आहे ना स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार
नाही म्हणाली तर तुझ्या प्रेमाने नकाराला होकारात बदल
नाही म्हणाली तर तिच्या नकारावर ही प्रेम करावं
नाही म्हणता म्हणता तिला प्रेम करायला शिकवावं
तुझे खरे रूप पाहून कदाचित बदलेल तिचा विचार
तिला ही मग होईल बघ तुझ्या प्रेमाचा आजार
प्रेम करतोस ना तिच्यावर मग कर फक्त प्रेमाचा वर्षाव
तिने ही करावं प्रेम म्हणून आणायचा नसतो दबाव.

काव्यगंध

Post a Comment

Previous Post Next Post