ती कशी असावी

 फुलापरी कोमल नसली तरी चालेल पण कट्यासारखी बोचक नसावी
स्वतःचाच विचार करणारी selfish असली तरी चालेल
पण स्वतःच्या  स्वार्थासाठी दुसऱ्याचं वाईट चिंतनारी नसावी
रोज रोज फोन करून तासंतास  बोलणारी नसली तरी चालेल पण दुःखाच्या क्षणात अविस्मरणीय मिठी देणारी असावी
shoping करणारी पैसे उधळणारी असली तरी चालेल पण भोळेपणाच सोंग  घेऊन गैरफायदा घेणारी नसावी
लहान मुलांसारखी हट्ट करणारी असली तरी चालेल पण
जळकट मन घेऊन जळणारी नसावी
जीव ओवाळून टाकणारी नसली तरी चालेल पण क्षणाक्षणात जीव घेणारी नसावी
आयुष्यभर साथ देणारी नसली तरी चालेल पण जिथंपर्यंत असेल तिथंपर्यंत  तरी गोड असावी
 
 
 
 
 
 
 
 

1 Comments

Post a Comment

Previous Post Next Post