जगणं घेता येत नाही वाटुन..

 तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींपासून खूप दूरावले असाल त्यांची आठवण येत आहे किंवा मग तुम्हाला त्यांचं दुःख सुख वाटून घ्यायच आहे. तुम्हाला त्यांचा वेळ घ्यायचा आहे किंवा तुम्हाला त्यांना वेळ द्यायचा आहे. मी नाही केलेली ही कविता पण जेव्हा कानावर पडली तेव्हा सर्वांची आठवण झाली. म्हणून मनात आलं की आपण ही लिहिली पाहिजे.म्हणून तुम्ही पण वाचा आठवण नक्की येईल. कविता लहान आहे पण आठवण नक्कीच मोठी करून जाईल.

खूपदा वाटतं त्याच्या सारखं जगावं.
त्याच्याच नजरेने जगाकडे पहावं.
Income च्या गुनिलेला इच्छांनी भागवं आणि मनातलं वास्तव स्वप्नात मागावं.
यश खावं त्यासारख पुसून आणि चाटून.
पण सालं जगणं घेता येत नाही वाटून.
खूपदा वाटतं त्यांच्यासारखं टुलाव
त्याच्या बागेत एकदा तरी माझं फुल फुलावं.
त्याच्यातल्या माझ्याशी खूप खूप बोलावं आणि मनातल्या कांद्याचं एक साल चुराव.
सुखा जवळ उभ राहावं त्याच्या सारखं रेटून,दुःखात बळ यावं त्याच्या कडे बघुन.
पण सालं जगणं घेता येत नाही वाटुन.
खूपदा वाटतं त्याच्या सारखं हसावं,सांडलेल्या दुःखाला सुखाने पुसावं, अश्रूंच्या आरशातही सदा हसरं दिसावं.
मौजेच्या गारा वेचत पावसात बसावं
सुखी त्याच्या सदराचे धागे गेले फाटून .
पण सालं जगणं घेता येत नाही वाटुनं.

 


1 Comments

Post a Comment

Previous Post Next Post