उजाळा आठवणींचा (मराठी शाळा)

मित्र हुशार असतो मित्र मंद असतो

पण तो जोपर्यंत सोबत आहे

तो पर्यंत दुःखाचा दर्वाजा

काळजा साठी बंद असतो

वाट चुकणार नाही जीवन भर तुझी

फक्त एक मित्र कर तू आरश्या सारखा

का उगाच फिरता देव शोधायला

मित्र आहे जवळ मंदिरा सारखा

आयुष्यात आई, वडील,बहीण,भाऊ सोडून पहिल्यांदा कोणाबरोबर तरी शाळेचा पहिला दिवस गेला आठवत नाही कसा गेला पण त्या दिवशी सगळेच रडले असतील हे नक्की.मग हळू हळू दिवसा मागे दिवस जाऊ लागले हळू हळू सगळ्यांशी ओळख व्हायला लागली मग बोबड्या बोलणाऱ्या ओठांना स्वतःचं नाव नीट म्हणता येत नव्हतं पण या सगळ्यांचे नाव मात्र नीट यायला लागली होती.मग सुरू झाला तो आयुष्याला वळण देणारा मराठी शाळेचा प्रवास मग कधी गंमत जंमत तर कधी रुसवे-फुगवे  गोड मात्र लगेचच व्हायचं. कशाचाही तणाव नसलेल्या सामाई आणि बारामाई च्या परीक्षा आणि  असायचं  फक्त ते तणावाचं नाटक.सगळ्यांचं ते एकत्र खेळण मग ते लगंडी-लगंडी  असुदे किंवा मग लपंडाव ती मज्जाच वेगळी होती.सगळ्यात जास्त मज्जा यायची ती म्हणजे स्वतःचे झाडे लाऊन बाग तयार करून त्यांना पाणी टाकायचं आहे हे सरांना सांगून वर्गातून दोन-तीन तास बाहेर फिरायच. एकदा शालेय स्तरावर सांस्कृतिक कार्यक्रम होता तर त्या वेळेस शाळेतून आमच्या एका मित्राची निवड झाली भाऊ तालुका स्तरावर जिंकला पण नंतर एवढा त्रास दिला की शाळेत काहीही कार्यक्रम राहिला की त्याच एकच गाणं असायचं ते म्हणजे "कठीण न घोंगडं घेऊद्या की र मला बी जत्रेला येवुद्या की र" शेवटी  गाणंच काय तर कोणत्या शब्दा च्या वेळेस कोणता पाय उचलेल हे सुध्या आमचं  पाठ झालेलं असा तो आमचा बारक्या मित्र.सरांनी सागितलं की शाळेची बेल वाजण्या साठीची धडपड.शाळा सुटली की गेट च्या बाहेर आधी कोण जाणार याची शर्यद.अश्या सगळ्या गंमती जंमती करत आम्ही मराठी शाळेचे मुल मोठे झालो.आणि सगळ्यांनी नंतर वेगवेगळ्या शाळेत प्रवेश घेतला पण तरी आज सगळे एकत्र आले हे पाहून बरे वाटले मला खूप दिवस लागले एकत्र आणायला कोणाला वेळ नव्हता कोणाला सुट्टी नव्हती  पण शेवटी कसं का होईना लहान पणीचे त्या दिवसांची आठवण काढायला सगळ्यांना एकत्र यायचं होत आणि सगळे आले देखील पण खरचं कधी न अनुभवता येणारे दिवस गेले आहेत आणि उरल्या आहेत त्या फक्त कधी न विसरता येणाऱ्या आठवणी.



 

 



 


 


 


4 Comments

Post a Comment

Previous Post Next Post