शेती

 

भले दिवस भर

उन्हातान्हात काम करु पन

धंदा शेतीचाच करु

काळ्या ठेकळ्याचं रान

आम्ही हिरव्या शालुत उगवलं

बिन मिठाच्या चटनी वरती

आख्या दिवस आम्ही काढतो

यांना कुठे कळतयं

किती भेगा पडतात टाचेवर  

वाटत असेल ज्यांना शेती पाण्यावर होते

कधी येवून बघा शेतीत

शेती आमच्या घामामुळे होते

सगळेचं लुटतात कि ओ आम्हाला

पण आम्ही नाही कोनाला फसवत

कारन एक वचन दिलंय आम्ही

या मातीला श्वासात श्वास असे

पर्यंत ईचीच सेवा कण्याचं

भले दिवस भर

उन्हातान्हात काम करु पन

धंदा शेतीचाच करु

                     -हेमंत‌ 



 

 

15 Comments

Post a Comment

Previous Post Next Post