कोणीतरी आठवण काढतंय बाकी काही नाही


             हसता हसता डोळे अलगत येतील भरून
बोलता बोलता शब्द ओठी जातील विसरून
 कावरं बावरं होण्यासारखं बिल्कुल काही नाही
कोणीतरी आठवण काढतंय बाकी काही नाही
रस्त्यामध्ये दिसतात की चेहरे येता जाता
एका सारखेच दिसू लागतात सहज बघता बघता
अवतीभोवती सगळीकडे तोच माणूस दिसेन
सृष्टी मध्ये दोनच जीव आणखी कोणी नसेल
भिरभिरल्यागत होण्यासारखं बिल्कुल काही नाही
कोणीतरी आठवण काढतंय बाकी काही नाही
मोबाईल वाजण्याआधीच तो वाजल्यासारखा  वाटेल
जुनाच एखादा sms काढून वाचावासा वाटेल
दिवस सरता सरता वाटेल उगीचं
पाउलो पाउल जड होत जातील श्वास
घाबरण्यासारखं बिल्कुल काही नाही
कोणीतरी आठवण काढतंय बाकी काही नाही
जेवता जेवता लागेल जीवघेणा ठसका
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता
चेहरा लपवत डोळे पुसत पाणी प्यावे थोडे
बोलण्या आधी मात्र आवाज आला सांभाळावे थोडे
सांगून द्याव काळजी करण्यासारखं बिल्कुल काही नाही
कोणीतरी आठवण काढतंय बाकी काही नाही




11 Comments

Post a Comment

Previous Post Next Post