धडा



प्रेम तर खूप होत पुस्तकांवर पण फक्त प्रेम करून चालत
नाही ते समजावं पण लागतं
आपल्या आयुष्याच्या पुस्तकांच पण तसच असतं फक्त पुस्तकावर
 प्रेम करून कोणी pass  होत नाही.
तर ते पुस्तक समजून पण घ्याव म्हणजे
आपल्याला त्याच्यात काय आहे हे तरी  समजेल
आपलं आयुष्य पण एक पुस्तक आहे ते जगण्यासाठी
आपल्याला प्रत्येक पान उलटून बघितल पाहिजे.
आपल्या पुस्तकात प्रत्येक धडा हा सोपा नसतो काही कठीण पण असतात
पण आपण थोडा जास्त आभ्यास
केला तर कठीण पण सोपं होऊन जात.
आपलं आयुष्य पण असच आहे तिथे कधी चांगला तर
कधी वाईट काळ हा येत असतो आणि
वाईट काळ हा जास्त दिवस नसतो तो फक्त येतो की आपण
या जगात किती वेळ जगू शकतो वाईट काळ येतो
आपल सामर्थ्य बघण्यासाठी म्हणून वाईट काळ आला म्हणून
आयुष्य संपविणे हा काय शेवटचा पर्याय नसतो.
आणि आपल्या आयुष्याच्या पुस्तकात नक्कीच सर्व कठीण नसत.
एक असं पान पण येत कि तिथे आपल्याला सर्व मिळत
आणि आपल्याला कशाचीच भिती नसते पण एक पान असं पण
येत की त्याच्या पुढे कुठलच पान उरत नाही उरतो तो
फक्त आपला मृत्यू म्हणून जोपर्यंत आपल्या पुस्तकाची पाने आहेत
तोपर्यंत प्रत्त्येक पान उलटून बघा आयुष्य नक्कीच चांगल जाईल...
                                                                               ---हेमंत---


2 Comments

Post a Comment

Previous Post Next Post