अपेक्षा🙏🙇


शेवटी ठेवल्या जातात त्या अपेक्षा 
असतात आणि राहतातही अपेक्षा
आई-वडिलांच्या मुलाकडूनच्या अपेक्षा
बहिणीच्या भावाकडूनच्या अपेक्षा
आपल्या  मित्राकडूनच्या अपेक्षा
नातेवाईकांच्या आपल्याकडूनच्या अपेक्षा
असतात आणि राहतातही अपेक्षा
स्वतःच्या स्वतःकडूनही अपेक्षा
इतरांकडूनही असतातच अपेक्षा
जगतांना असाव्यातही अपेक्षा
आणि नसाव्यात का अपेक्षा
चुकत जातात त्या अपेक्षा
गोष्टी घडवतातही अपेक्षा
आणि बिघडवतातही अपेक्षा
मनावरचं ओझही अपेक्षा
डोक्यावरचा भारही अपेक्षा
मुळात ठेवाव्यात का अपेक्षा?
शेवटी ठेवल्या जातात त्या अपेक्षा
असतात आणि राहतातही अपेक्षा
🙏🙇



2 Comments

Post a Comment

Previous Post Next Post